

Nagpur News
esakal
नागपूर: मनपाच्या कामकाजात पारदर्शकता, वेग आणि निधीची बचत साधण्यासाठी मनपाकडून अत्याधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित एकात्मिक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येत आहे. त्यावर मनपाच्या अखत्यारितील सर्व विभागांची माहिती ‘लेअर’ स्वरूपात उपलब्ध होणार असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भविष्यात नागरिकांनाही एका क्लिकवर शहराचा सविस्तर डेटा पाहता येणार आहे.