
नागपूर : आधुनिक काळात इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व वाढत असताना, मनपाच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांवरच अधिक भर दिला जात आहे. मनपाच्या ११४ शाळांपैकी मोजक्या ११ शाळांमध्येच दहावीपर्यंत सेमी-इंग्रजी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत सेमी-इंग्रजी शिक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.