

Nagpur Municipal Corporation
sakal
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या मतदार प्रभाग (वॉर्ड) रचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. परंतु, या मुद्यावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई येथे मुख्य न्यायमूर्तींच्या समक्ष संयुक्त सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबरला दिले. त्यानुसार, दुनेश्वर पेठे यांच्या प्रभाग २३ आणि २६ वरील आक्षेपांवर देखील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.