

Nagpur News
esakal
नागपूर: ‘आपली बस’च्या सीताबर्डी टर्मिनलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंजे चौकातील प्रवासी निवाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात येथे नेहमी पाणी साचून राहते. एेरवी कचरा आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करणे कठीण होत आहे. प्रवाशांना नाकातोंडावर रुमाल ठेवून बसची प्रतीक्षा करावी लागते. निवाऱ्याच्या या अवस्थेवरून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.