
नागपूर : १४ वर्षीय मुलाकडून युवकाचा खून
काटोल : लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादानंतर संतापलेल्या एका चौदा वर्षीय मुलाने २६ वर्षाच्या युवकाचा चाकूने सपासप वार करीत खून केल्याची घटना येथील साठेनगरात गुरूवारी रात्री घडली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णा भाऊ नगर सभागृहात होता गायकवाड परिवारातील विवाह समारंभ सुरू होता. यावेळी तरुण लग्न वरातीत नाचण्यात गुंग होते. दरम्यान कार्यालयाजवळ अल्पवयीन मुलगा आणि राहुल श्रावण गायकवाड (२६) यांच्यात वाद झाला. यामुळे राग आलेल्या चौदा वर्षीय मुलाने राहूलवर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. राहूलला तातडीने नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे विवाहाच्या आनंद सोहळ्यावर विरजण पडले. मुलाकडून शस्त्र जप्त केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे हे करीत आहेत.
Web Title: Nagpur Murder Case Fourteen Year Old Boy Wedding Dance Argument
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..