
नागपूर : बालपणीच्या मित्राच्या आईचा गळा चिरून तिची हत्या करणाऱ्या आरोपीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नवीन सुरेश गोटाफोडे (३०, रा. देशपांडे लेआउट) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक मुळे (३१) या मुलाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.