
Nagpur Murder : नागपूरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाची भरदिवसा हत्या, कारण…
महाराष्ट्रातील नागपूर शहरात रविवारी एका दुकानासमोर भरदीवसा एका व्यक्तीची पाच जणांनी हत्या केल्याचा आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मृताचे या लोकांशी भांडण झाले होते.
राजेश मेश्राम (23) असे मृताचे नाव असून शनिवारी सायंकाळी समता नगर भागातील एका बिअर बारमध्ये मयत आणि पाच आरोपींमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राजेशचा बदला घेण्यासाठी पाच जणांनी कट रचला आणि रविवारी सकाळी 10 वाजता कमल चौराहा येथील पान दुकानासमोर त्याला थांबवले आणि आरोपींनी राजेशचा भरदिवसा भोसकून खून केला.
हेही वाचा: Team India : वर्ल्ड कप कसा जिंकायचा? रोहितच्या उपस्थितीत BCCIचे 'या' तीन निर्णयावर शिक्कामोर्तब
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही हत्येच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली कार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, मृताच्या नावावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपवर अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; 'दोन प्रौढ व्यक्ती…'