Nandigram Express: नंदीग्रामचे वणीवरून पुनरागमन,वणीकरांनी केले चालकांचे स्वागत; रेल्वे स्टेशनची दयनीय अवस्था

नागपूरवरून मुंबईला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही कोविड काळामध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती सुरू करण्यात आलीच नाही. शनिवारी (१६) पासून वणीवरून पुनरागमन झाले.
Nagpur Nandigram Express
Nagpur Nandigram ExpressEsakal
Updated on

Nandigram Express Hoult at Vani: नागपूरवरून मुंबईला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही कोविड काळामध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती सुरू करण्यात आलीच नाही. शनिवारी (१६) पासून वणीवरून पुनरागमन झाले. मात्र, तिचे सुटण्याचे ठिकाण नागपूरऐवजी बल्लारपूर करण्यात आले आहे.

वणी विभागातील जनतेला मुंबईला जाण्यासाठी सोयीस्कर असलेली नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने कोविड काळात बंद करून तिला मुंबई ते आदीलाबाद पर्यंत सुरु ठेवण्यात आली. ती गाडी पूर्ववत सुरु करावी, अशी वणीकरांची मागणी होती. वणीतून अशी निवेदनेही रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. शनिवारी चाचणी म्हणून बल्लारशावरून मुंबईसाठी विशेष गाडी सोडण्यात आली. ही गाडी सकाळी ९.३० वाजता वणी रेल्वे स्थानकावर पोहचताच वणीकरांनी गाडीच्या दोन्ही चालकांचे स्वागत व सत्कार केला.

यामध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, रवी बेलुरकर, विजय पिदुरकर, मानवी हक्क परिषदेचे राजू धावंजेवार, रेल्वे प्रवासी संघटनेचे जयंत सोनटक्के, दीपक कोकास यांनी सत्कार केला. यावेळी शेकडो वणीकरांची उपस्थिती होती. शनिवारच्या विशेष गाडीचे आरक्षण ऑनलाईन करता येत नव्हते. त्यामुळे गाडी संपूर्ण रिकामी होती. पुढील दोन दिवसानंतर ही गाडी नंदीग्राम एक्सप्रेस नावाने दररोज वेळापत्रकाप्रमाणे वणीवरून जाईल, असे रेल्वेस्थानक प्रमुख सिंग यांनी सांगितले. (Latest Marathi News )

वणीवरून साप्ताहिक चार-पाच रेल्वेगाडया जातात. या गाड्यांचा वणीला थांबाही आहे. मात्र, वणीच्या रेल्वे स्थानकाची एवढी दयनीय अवस्था आहे की, तेथे अंगावरचे कपडे क्षणात काळे होतात. एवढी कोळशाची धूळ प्लॉटफार्मवर साचलेली आहे. प्रवाशांना बसणे तर सोडाच उभेही राहताना विचार करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचे स्टँडपोस्ट बंद आहेत. स्टेशनवरील जलशुद्धीकरण यंत्र घाणेरडे झालेले आहे. येथील कोळशाची सायडिंग दूर हटविल्याशिवाय स्टेशनची अवस्था सुधारणार नाही.

Nagpur Nandigram Express
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, नागपूरसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com