
Nagpur : आज अजित पवार, जयंत पाटील नागपूरात
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शनिवारी नागपूरला येत आहेत. रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात तीन आणि चार जूनला हे शिबिर होऊ घातले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.३) शिबिराचे उद्घाटन होणार असून समारोप आज अजित पवार, जयंत पाटील येणार शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. शिबिरात राज्यभरातून सुमारे सातशे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल,
ओबीसीचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे आदीही शिबिरात उपस्थिती लावणार आहेत. शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, आमदार अमोल मिटकरी, ॲड. अंजली साळवे, धनगर युवा नेत्या सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे हे ओबीसींच्या विविध विषयांवर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार आहेत.
अजित पवार आणि जयंत पाटील सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर दाखल होणार आहेत. येथून दोन्ही नेते चंद्रपूरला जाऊन दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तेथून परत नागपूरला आल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ओबीसी शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.