

Nagpur News: BJP Leader Claims Cannabis Plants Found in Municipal Garden
esakal
नागपूरच्या अजनी परिसरातील गजानन उद्यानात गांजाची झाडे लावण्यात आल्याचा गंभीर दावा समोर आला असून, या प्रकरणामुळे महापालिका आणि पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी उद्यानातील गांजाच्या झाडांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.