Nagpur News : दुरंतोचा प्रवास सर्वसामांन्यांसाठी अवाक्याच्या बाहेर! स्लीपर कोचची संख्या ८ वरून २ वर

Nagpur News
Nagpur News

नागपूर : राज्याच्या उपराजधानीतून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे विदर्भ, सेवाग्राम या दैनंदिन गाड्या हाऊसफुल असतात. वेटिंगमुळे प्रवासी दुरंतो निवडतात. मात्र, आता गाडी क्रमांक १२२९०/१२२८९ दुरंतो एक्स्प्रेसचे स्लीपरचे डबे कमी करून एसी थ्री टीयरचे वाढविल्याने प्रवास महागला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी दुरंतोचा प्रवास दुरापास्त ठरला आहे.

Nagpur News
Crime News : चोरीच्या पैशातून काढले टॅटू, आयफोन खरेदी; दोन आरोपींसह विधिसंघर्ष बालकाला अटक

सर्वसामान्यांना परवडणारी भारतीय रेल्वेची ओळख आता श्रीमंतांची रेल्वे अशी होत आहे. प्रवासाचे स्वस्त साधन म्हणून रेल्वेला पसंती आहे. हेच स्वस्त साधन आता महाग होत आहे. वेगवान गाड्या म्हणून वंदे भारत ट्रेनचा धडाका सुरू आहे. मात्र, त्यातील सर्व कोच एसी चेअर कारचे असल्याने तिकीट महाग आहे. नागपूर ते बिलासपूर सुरू झालेल्या या ट्रेनमध्ये तिकीट दर पाहून सामान्य प्रवासी याकडे वळत नाहीत.

नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्यांची पसंती विदर्भ आणि सेवाग्राम एक्स्प्रेसला जास्त आहे. मात्र, या दैनंदिन गाड्यांमध्ये आरक्षित तिकीट मिळणे अवघड आहे. जनरल आणि स्लीपर डबे असलेल्या या गाड्यांचे तिकीट दर परवडणारे असते. मात्र, स्लीपर डब्याचे तिकीट आरक्षित होत नसल्यास प्रवासी दुरंतोकडे वळतात.

या गाडीला आधीपासूनच जनरल डबा नाही. स्लीपर आणि एसी डब्यांची गाडी असलेल्या दुरंतोचे तिकीट या दोन गाड्यांच्या तुलनेत महागच आहे. पूर्वी दुरंतोला ८ स्लीपर कोच होते. आता ते कमी करून केवळ २ केले आहे. त्याऐवजी एससी थ्री टीयरचे डबे वाढविले आहे. पूर्वी एसी थ्री टीयरचे डबे ९ होते आता ते वाढवून १५ करण्यात आले आहे.

Nagpur News
Maharashtra Politics : इच्छा आहे तोपर्यंतच 'मविआ'मध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले...

स्लीपरचे तिकीट ६८५ रुपये आहे. तर एसी थ्री टीयरचे तिकीट १ हजार ८९० रुपये आहे. दोन्ही भाड्यात १ हजार २०५ रुपयांची तफावत आहे. साहजीकच सामान्यांना स्लीपरचे भाडे परवडणारे आहे. मात्र, आता स्लीपर कोच कमी झाल्याने दुरंतोचा प्रवास सामान्यांसाठी राहिलेला नाही.

दुरंतोचा स्लीपर कोच हाऊसफूल

दुरंतो एक्स्प्रेसची २० जूनची दुपारी ४ वाजतापर्यंतची स्थिती पाहिली असता स्लीपर कोचमध्ये ११० वेटिंग होते. तीच एसी थ्री टीयर कोचची स्थिती बघितली असता ४५ सीट उपलब्ध होत्या. भाडे कमी असल्याने सामान्य व्यक्ती स्लीपरने जाणे पसंत करतात. त्यामुळे स्लीपरमध्ये नेहमीच वेटिंग असते. स्लीपर कोचची संख्या कमी केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

रेल्वेत आता मध्यमवर्ग, सामान्य लोकांना डावलून श्रीमंतांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी विचलीत झाला आहे. रेल्वेने गरिबांचाही विचार करावा. दुरंतोचे कमी केलेले स्लीपरचे कोच पुन्हा वाढवायला हवे.

- बसंतकुमार शुक्ला, सचिव- भारतीय यात्री केंद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com