Nagpur News : जुनी पेन्शन वाढविणार विद्यार्थ्यांचे टेन्शन| Old pension increase tension students Teachers union strike affect paper | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers union strike affect paper

Nagpur News : जुनी पेन्शन वाढविणार विद्यार्थ्यांचे टेन्शन?

नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी उद्या मंगळवारपासून (ता.१४) बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. अशावेळी बोर्डाचे दहावी आणि बारावीचे पेपर प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढणार आहे.

राज्यातील जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका उद्या असलेल्या दहावी आणि बारावीच्या पेपरवर होण्याची शक्यता आहे. दहावीमध्ये विभागात पावणेदोन लाख तर बारावीत दीड लाखावर विद्यार्थी बसले आहेत. २५ तारखेपर्यंत दहावीचे पेपर घेण्यात येणार असून बारावीचे दोन पेपर घेण्यात येणार आहे.

बोर्डाच्या बहुतांश कामात शिक्षकांचा समावेश असल्याने पेपर नेऊन देण्यापासून पेपर घेण्यापर्यंत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याने अशावेळी शिक्षकांनी पुकारलेल्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. बोर्ड वा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून तशी शक्यता नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्यातील शिक्षकांनी आग्रही भूमिका घेतल्याने पेपरवर संकटाचे ढग कायम आहे.

महाविद्यालयस्तरावरील परीक्षांवर सावट

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या महाविद्यालय स्तरावर सुरू आहेत. विद्यापीठातील कर्मचारी संघटनांसह शिक्षक संघटनांनी संपात सहभागी आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरील परीक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. राज्यातील शिक्षकांची मोठी संघटना असलेल्या एमफुक्टोनेही संपाला पाठींबा दर्शविला आहे.

मात्र, त्यांनी कामबंद आंदोलनात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय राज्याच्या समाजकार्य शिक्षकांची संघटना ‘मास्वे’नेही संपाला पाठींबा दर्शविला आहे