
विजयगोपाल : सध्या रबी हंगामाला प्रारंभ झाला आहे. या काळात शेतात असलेल्या पिकांना ओलित करणे महत्त्वाचे असल्याने शेतकऱ्यांकडून तशी व्यवस्था करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांकडून शेतातील विहिरीवर मोटारपंप लावण्यात येतो. मात्र, त्या पंपांवर आता चौरट्यांची वक्रदृष्टी आली असून ते लंपास करण्याचा सपाट परिसरात सुरू झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर नवेच संकट ओढवले असून पोलिसांनी यावर बंदोबस्त करण्यात मागणी होत आहे.