Nagpur News : आरयूबीसह होणार दोनशे कोटींची कामे; केंद्रीय मंत्री गडकरी नाईक तलाव भुयारी मार्गाचे भूमिपूजन

या भुयारी मार्गाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
nitin gadkari
nitin gadkari sakal

नागपूर - शहरातील मनीषनगर आरयूबीला अप्रोच रोड, नाईक तलाव आरयूबीसह जिल्ह्यात दोनशे कोटींच्या विकासकामांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते मानस चौक भुयारी मार्गाचे काम येत्या आठ दिवसांत सुरू होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या भुयारी मार्गाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स भुयारी मार्गामुळे व्हेरायटी चौक, झाशी राणी चौकातून वाहतूक कोंडी कमी होईल. याशिवाय विद्यापीठा चौकात सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून अमरावती मार्गावर उड्डाणपुलाचे काम येत्या तीन चार महिन्यांत पूर्ण होणार असून या पूलाला स्वर्गीय श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी झीरो माईल ते विद्यापीठापर्यंतच्या मार्गाचे स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर असे नामकरण झाल्याचे जाहीर केले. त्यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्गाला स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देणे हा आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. रामदास आंबटकर, वर्धाचे आमदार डॉ. पंकज भोयर,

nitin gadkari
Nagpur News : सम्राट अशोकांचा पुतळा येणार दीक्षाभूमीवर; कर्नाटकातून २५ हजार अनुयायी होणार दाखल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने, स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे सहसचिव अरुण लखानी, सचिव माजी खासदार अजय संचेती, दत्ताजी डिडोळकर यांच्या कुटुंबातील विजय डिडोळकर, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जयंत पाठक यांनी व संचालन रेणूका देशकर यांनी तर आभार मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com