नागपूर : अजित पवार, वळसे पाटील गडकरींच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari Latest News

नागपूर : अजित पवार, वळसे पाटील गडकरींच्या भेटीला

नागपूर : राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घरी जाऊन भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांनी पवार यांच्या हस्ते झालेल्या पोलिस भवनच्या उद्र्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असताना हा भेटीगाठीचा कार्यक्रम झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज पवार आणि पाटील यांनी शहरातील अनेक कार्यक्रमांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन केले. पोलिस भवन कार्यक्रमाला गडकरी विशेष अतिथी होते. ते तेलंगण दौऱ्यावर असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निमंत्रण पत्रिकेत सन्मानजनक स्थान दिले नसल्याने भाजप आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तसेच निषेधही नोंदवला होता. या सर्व।घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार आणि वळसे पाटील यांनीनी गडकरी यांची भेट घेतली. हा फडणवीस यांना शह मानला जात आहे. शुक्रवार सायंकाळी पावणे सातच्या सुमारास दोन्ही नेते गडकरींच्या घरी पोहचले. तत्पूर्वी, ते पशुसवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाततील कार्यक्रम आटोपून आले.

तिघांमध्येच चर्चा!

सुमारे २० मिनिटे दोघे गडकरी यांच्या घरी होते. येथे दुसऱ्या कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. छायाचित्रकाराला आत प्रेवश नाकारण्यात आला. त्यामुळे आत काय नेमके खलबते झाले याची माहिती मिळू शकली नाही. मंत्री ही औपचारिक भेट होती असे गडकरींच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

Web Title: Nagpur Nitin Gadkari House Ajit Pawar Valse Patil Gadkari Meets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top