esakal | Nagpur : मोकळ्या भूखंडधारकांवर अजूनही कारवाई नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : मोकळ्या भूखंडधारकांवर अजूनही कारवाई नाहीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात डेंगी, मलेरियाचा प्रकोप कायम आहे. मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे डासांनी हैदोस मांडला. शहरातील सर्वच भागातील नागरिक त्रस्त असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र ही स्थिती दिसत नसल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्तांनी मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाईचे आदेश काढले. परंतु, अद्यापही कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

शहराच्या सर्वच वस्त्यांमध्ये मोकळे भूखंड आहेत. जमिनीचा हव्यास असलेल्या नागरिकांनी ही भूखंंड खरेदी केली. या भूखंडामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सध्या दररोज पाऊस येत असल्याने पावसाचे पाणी या भूखंडांवर जमा होत आहे. अनेक भूखंडांवर झुडपं वाढली आहे.

भूखंडांवर जमा होत असलेल्या पाण्यात डेंगी, मलेरिया पसरविणारे डास तयार होत आहे. त्यामुळे शहरात डेंगीचा प्रकोप कायम आहे. किंबहुना डेंगीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा दिवसांत शहरात नवे शंभरावर डेंगीचे रुग्ण आढळून आले. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ८८४ रुग्ण डेंगीने ग्रस्त झाले.

हेही वाचा: Nagpur : जिल्हा परिषदेचं चाललयं तरी काय ?

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्याची समस्या निर्माण झाल्यानंतर महापालिकेने घरांचे सर्वेक्षण करून डेंगीचे रुग्ण शोधण्याचा पर्याय निवडला. परंतु ज्या मोकळ्या भूखंडांमुळे डेंगी, मलेरियाचा हैदोस वाढला. त्या मोकळ्या भूखंडमालकंवर कारवाईसाठी अद्यापही पुढाकार घेतला नाही. काही जणांना नोटीस पाठवून महापालिकेने केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. अजूनही मोकळे भूखंडधारक मोकाट आहेत. आयुक्तांनी मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाईचे आदेश दिले. परंतु त्यांच्या आदेशाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

झोन कार्यालयाकडून आयुक्तांचे आदेश पायदळी

मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर झोनच्या सहायक आयुक्तांकडून त्यांची अंमलबजावणी आवश्यक होती. परंतु झोन सहायक आयुक्तांकडून कारवाई केली जात नसल्याचे सुत्राने नमुद केले. सहायक आयुक्तांकडून मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न निमित्त विचारला जात आहे.

श्रीमंतांची गुंतवणूक सामान्यांना मनस्ताप

अनेकांनी केवळ गुंतवणुकीसाठी भूखंड खरेदी केले. श्रीमंतांची गुंतवणूक सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरली आहे. शहरात असे एकूण ४० हजारांवर मोकळे भूखंड आहेत. गुंतवणुकीसाठी खरेदी केल्याने भूखंडमालक येऊनही पाहात नाही. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने कोंडी होत आहे.

मोकळ्या भूखंडांवरील झुडपामुळे आरोग्याची समस्या आहेच, शिवाय साप, विंचू इतर किटकाचीही भीती आहे. मोकळ्या भूखंडधारकांकडून दहापटीने टॅक्स वसूल करण्याची गरज आहे. आमच्या भागात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आहे. मोकळ्या भूखंडांवरील घाण, कचरा, साचलेले पाणी डासांसाठी नंदनवन ठरले. परंतु या मालकांवर कारवाई होत नाही.

- गजानन कापसे, दीनदयालनगर.

loading image
go to top