

Nagpur News
esakal
नागपूर: कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारामध्ये करार हे अत्यंत महत्त्वाचे, किंबहुना सर्वात केंद्रस्थानी असलेली बाब मानली जाते. खरेदी-विक्री, भाडेकरार, हस्तांतरण अशा सर्व व्यवहारांना कायदेशीर वैधता मिळवून देण्याचे काम कराराद्वारेच केले जाते. त्यामुळे, या प्रक्रियेत सहभागी असलेले नोटरी, टंकलेखक आणि मुद्रांक विक्रेते हे व्यवहार सुलभपणे पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.