नागपूर : मेडिकलमधील वॉर्ड आता होताहेत रिकामे

परिचारिकांचा संप; सहा दिवसांत ३०० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
Nagpur nurses Strike Medical wards empty 300 surgeries postponed
Nagpur nurses Strike Medical wards empty 300 surgeries postponed sakal

नागपूर : वैद्यकीय शिक्षण विभागात परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाच्या आऊसोर्सिंगचा विरोध करण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा चक्क कोमात गेली आहे. येथील डॉक्टरांना रुग्णांना सर्रास सुटी देण्यास सुरवात केल्याने वॉर्ड रिकामे होत आहेत. यानंतरही प्रशासन मात्र ढिम्म आहे.

सहा दिवसांपूर्वी २६ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेला मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील संप सहाव्या दिवशी सुरू आहे. यामुळे येथील रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. सहा दिवसात या तीनही रुग्णालयातील सुमारे ३०० पेक्षा अधिक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १०० टक्के वॉर्ड परिचारिकांशिवाय आहेत. मात्र यानंतरही प्रशासनाकडून रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परिचारिकांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला बसला. येथे सर्व प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. मेडिकलमध्ये दर दिवसाला ७ ते ८ परिचारिका कर्तव्यावर असतात. मेयो आणि सुपर स्पेशालिटीची हीच स्थिती आहे. तीनही रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या बेमुदत संपात ९९ टक्के परिचारिका सहभागी झाल्या आहेत.

रुजू झाले अन संपावर गेले

मेडिकलमधील ४५ परिचारिका विविध प्रकारच्या रजांवर होत्या. शासनाच्या आदेशाप्रमाणे सुट्या रद्द होताच मेडिकलमध्ये रुजू झाल्या आणि रुजू करून घेतल्यानंतर ४५ पैकी ४१ परिचारिका तत्काळ संपामध्ये सामील झाल्या. यामुळे मेडिकलमधील परिचारिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यामुळे रुग्णांना लाभ झाला नाही. हीच स्थिती मेयो आणि सुपर स्पेशालिटीतील आहे.

नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी तैनात

मेडिकलच्या बीएसस्सी नर्सिंग आणि एमएस्सी नर्सिंग कॉलेजमधील सुमारे २२५ विद्यार्थ्यांना परिचारिकांच्या जागेवर तैनात करण्यात आले आहे. मात्र मागील दोन वर्षांत कोरोनामुळे बीएसस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक करता आले नाही. तर यावर्षीच्या काही मुलांनाही वॉर्डात तैनात केले आहे. विशेष असे की, शासनाने सुट्या रद्द करण्याचे आदेश जारी करताच बीएस्सी आणि एमएसस्सी नर्सिंगचे सर्व विद्यार्थी, प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांनी तत्काळ रुजू होत ढासळलेल्या रुग्णसेवेचा डोलारा सांभाळण्यासाठी मदत करण्यास सुरवात केली आहे. ]

परिचारिकांच्या संपामुळे रुग्णाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली. शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी रजा रद्द करून रुजू झाले. बीएसस्सी, एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह नॉन क्लिनिकलच्या निवासी डॉक्टर तसेच डागा रुग्णालयातील काही परिचारिका आल्या आहेत. गरजेनुसार इमर्जन्सी सेवा सुरू आहेत.

-डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com