Nagpur : सायबर फसवणुकीची आता ऑनलाइन तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

Nagpur : सायबर फसवणुकीची आता ऑनलाइन तक्रार

नागपूर : सायबर फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यासोबतच आता ऑनलाइन सुद्धा करता येणार आहे. सीसीटीएनएस गो- लाइव्ह प्रणालीशी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पोलिस ठाण्यातच एफआयआर नोंदवण्यात येत होते. यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Nagpur : भाजप खेळणार महिला ओबीसी कार्ड

सायबर पोलिस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीच्या स्थानांतरण सोहळ्यात ते बोलत होते. सदरमधील पटेल बंगला इमारतीत स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचे कामकाज आज मंगळवारपासून सुरू झाले. या नवीन पोलिस ठाण्यात १५ अधिकाऱ्यांसह ६० कर्मचारी २४ तास काम करतील. त्याचबरोबर इतर ३३ पोलिस ठाण्यांमध्येही तक्रार नोंदविता येऊ शकते.

हेही वाचा: Nagpur : सभापती पदांसाठी आज निवडणूक

सायबर फसवणुकीची आता ऑनलाइन तक्रार

तक्रार मिळाल्यास पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही एफआयआर नोंदविणे बंधनकारक असेल. सर्व पोलिस ठाण्यांमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक आणि ५ कर्मचारी सायबरशी संबंधित तक्रारींसाठी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर सायबर गुन्ह्यांशी संबंधित हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nagpur : व्याघ्र प्रगणनेला स्थगिती द्या

महिलांशी संबंधित गुन्हे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविणाऱ्यांवरही हे पथक नजर ठेवेल. डीआयजी (गुन्हे) नवीनचंद्र रेड्डी, डीआयजी (दक्षिण विभाग) नीवा जैन, डीसीपी चिन्मय पंडित, संदीप पखाले, गजानन राजमाने आणि चेतना तिडके उपस्थित होते.

हेही वाचा: Nagpur : ७५ हेल्थपोस्टचा प्रकल्प गुंडाळण्याचा डाव

पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत पहिली एफआयआरही नोंदविण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाने ९ लाख रुपयांनी फसविले. त्याची तक्रार नोंदविण्यात आली.