Nagpur : ऑक्सिजन सिलिंडर स्फोट ; सुदैवाने जीवितहानी टळली

पाठोपाठ झालेल्या दोन स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात थरकाप उडाला.
स्फोट
स्फोट sakal

नागपूर : रिकाम्या प्लॉटवर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा पाठोपाठ स्फोट झाल्याने बेसा परिसर चांगलाच हादरला. ही घटना शुक्रवारी (ता.९) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, स्फोटाने रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या व नंतर आग लागली. यात बाजुलाच असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, बाजुला असलेले टाईल्सचे गोदाम, हॉटेल आणि इमारतींचे नुकसान झाले. यात एकाला दुखापत झाली.

पप्पू त्रिपाठी (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. त्यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय आहे. त्यात भाऊ प्रमोद त्रिपाठी (वय ३०) सुद्धा त्यांना मदत करतात. हायटेक रुग्णावहिका असलेल्या दोन टाटा विंगर श्रीरामनगरात पार्क करून ठेवल्या होत्या. पप्पू त्रिपाठी हे रुग्णवाहिकेजवळ असताना दुपारी ३ च्या सुमारास अचानक ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यासोबतच रुग्णवाहिकेने पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच दुसऱ्या सिलिंडरचाही स्फोट झाला. पाठोपाठ झालेल्या दोन स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात थरकाप उडाला. दुरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू येण्यासह रुग्णवाहिकांना आगीने कवेत घेतले. आकाशातील धुराचे लोट दुरवर दिसत होते. घटनेत पप्पू यांच्या गळा व पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना सुरक्षित बाहेर काढून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.

ऑक्सीजन सिलिंडर स्फोटाने बेसा हादरले

अन्यथा अनर्थ झाला असता

यूपी ६५- व्हीटी ६५०४ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत २ ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, मॉनिटरिंग युनीट, सक्शन मशीन, ३ सिरिंज पंप, २ सिलिंडर होते. याच गाडीतील दोन्ही सिलिंडरचा स्फेट झाला. या रुग्णवाहिकेलगतच उभ्या एमएच ३१-ईएम ०४०० क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत ५ ऑक्सिजन सिलिंडर, सिरिंज पंप, सक्शन मशीन अशी यंत्रणा होती. सुदैवाने या वाहनातील सर्व सिलिंडर सुखरूप राहिले अन्यथा घटनेची भिषणता वाढली असती.

हॉटेल, गोदाम, इमारतींना फटका

सिलिंडरच्या स्फोटामुळे ५० फुट अंतरावर अमित देखमुख यांच्या मालकीचे असलेल्या प्रमिल प्रकाश हॉटेलच्या छताची पीओपी कोसळली. खिडक्या तुटल्या, एसी निखळून पडले, टीव्ही पंद पडले. इमारतीचे सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱे तुटले. याशिवाय चुन्नीलाल पवार यांच्या मालकीच्या तेजस्वीनी मार्बल अॅण्ड हार्डवेअरच्या गोदामच्या मागेच दोन्ही रुग्णवाहिका उभ्या होत्या. गोदामावरील टिनाचे शेडला असलेल्या टीन अगदी उडून दूरवर जाऊन पडल्या. सुदैवाने त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. गोदामात असलेल्या टाईल्सचा अगदी चुराडा झाला. हार्डवेअरच्या साहित्याचेही नुकसान झाले.

अनेकांच्या खिडक्या तुटल्या, टीव्ही बिघडले

तसेच जवळच राहणारे सुरेश जयस्वाल यांच्या घरच्या खिडक्या, दार तुटले, टीव्ही नादुरुस्त झाला. राजेंद्र जयस्वाल यांच्याकडील ३ खिडक्याही तुटल्या. अन्य काहींकडील टीव्ही आवाजामुळे नादुरुस्त झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे.

आगीवर नियंत्रणासाठी लागले दोन तास

सिलेंडर स्फोटाने कानठळ्या बसविणारे आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली.घटनेनंतर तातडीने अग्नीशमन दलाला सूचना देण्यात आला. अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. रुग्णवाहिकेतून ज्वाळा निघत होत्या. तातडीने पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. सुमारे सव्वा ते दीड तासांत आगीवर नियंत्रण मिळाले पण, तोवर रुग्णवाहिकांच्या आतील बहुतेकच साहित्य भस्मसात झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com