

Nagpur Vehicle Theft by Painter: पेंटींगची काम करीत असताना, अधिकचा पैसा कमविण्याच्या नादात वाहनाची चोरी करणाऱ्या ४४ वर्षीय चोरट्याला पोलिसांनी तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिली. अब्दुल सत्तार वल्द अब्दुल शकुर (वय ४४, रा. वांजरा ले-आउट, यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला पाचपावलीतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणारे रवि एन.एस नागराज (वय ३६) यांची मोपेड सायंकाळी चोरीला गेली. त्यांनी पाचपावली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तपासात पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या नेतृत्वातील पथकाने अब्दुल सत्तार याला सापळा रचून अटक केली.
त्यानंतर चौकशी केल्यावर त्याने पाचपावलीतून चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय त्याने तहसील, पाचपावली येथून ४ लाख ४० हजार रुपयांची सात वाहने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ‘मास्टर की’ जप्त केली. (Latest Marathi News)
अजून तपास सुरूच आहे. पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल सत्तारकडून दहा वाहने चोरून झाल्यावर ती वाहने ऑटोडील्सला विकणार होता. ‘मास्टर की’ माध्यमातून सात वाहने त्याने चोरली. मात्र, दहा वाहने चोरण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे चोरी करीत मोठे होण्याचे त्याचे स्वप्नही भंगले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.