

नागपूर : बाजारातून खुले खाद्यतेल खरेदी करून त्यावर नामवंत कंपनीचे लेबल लावून विकणाऱ्या रॅकेटचा गुन्हेशाखेच्या युनिट चारच्या पथकाने पर्दाफाश केला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यावर शुक्रवारी (ता.१४) सकाळी छापा टाकून तेलाच्या ९८ डब्यांसह ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.