

Nagpur
esakal
नागपूर: सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या टीकेला नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. त्यांनी ‘त्या’ कार्यक्रमात मी जे काही बोललो, ते पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच बोललो. कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.