
नागपूर : शहरात सणासुदीच्या दिवसांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून शुक्रवार आणि शनिवारी ‘ऑपरशेन ऑल आउट राबविण्यात आले. त्यात विविध कलमांतर्गत १८८ जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांतील ६५८ गुन्हेगारांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७५ आरोपींचा रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आला.