
नागपूर : शहरात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. गेल्या तीन काही वर्षांत एमडीसह विविध अंमली पदार्थ्यांची यात भर पडली आहे. या पदार्थांच्या तस्करांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई करीत १५ महिन्यांत सुमारे सव्वासहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून ७३० आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.