
नागपूर : राज्यात वाघाचे शिकारी सक्रिय झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवी दिल्ली येथील गुन्हे नियंत्रण ब्युरोनेही अलर्ट दिल्यानंतर आता पोलिस विभागही अलर्ट झाला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अभयारण्यालगतच्या आणि ग्रामीण भागात सोशल मिडियाच्या माध्यमांतून ‘शिकारी आले’ या आशयाची जनजागृती मोहीम सुरू केली आहे.