Nagpur Crime : एटीएम फोडणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; ॲल्युमिनियमची पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडकवून चोरी

ATM Theft : नागपूरच्या खडगाव रोडवरील ॲक्सिस बँक एटीएममध्ये अज्ञात आरोपींनी ॲल्युमिनियम पट्टी लावून ग्राहकांची रक्कम अडकवण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिस तपास सुरू आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSakal
Updated on

वाडी : खडगाव मार्गावरील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी दुपारी २ वाजता अज्ञात आरोपींनी एटीएम मशीनच्या कॅश डिस्पेन्सरमध्ये ॲल्युमिनियमची पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडकवून चोरी करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापक दुर्गेश कोळमरकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून हा प्रकार उघडकीस आणला आणि वाडी पोलिसांना कळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com