

Nagpur police register case against X user for fake post claiming students surrounded RSS headquarters
नागपूर : अतिसंवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) महाल येथील मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणे एका युजरला महागात पडले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी ‘एक्स’ वरील संबंधित खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शहरात अफवा पसरवून शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.