

Nagpur Mayohospital bridge murder 2026
esakal
नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेयो हॉस्पिटलसमोरील रामझुला पुलाखाली गट्टूने डोके ठेचून युवकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना २० जानेवारीला दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे खुनाचा खुलासा करीत, दोन आरोपींना अटक केली.