
नागपूर : मार्टिन नगरमधील मोनक्रिफ दाम्पत्याच्या आत्महत्येबाबत केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार अनी (वय ४५) आणि जेरील ऊर्फ टोनी ऑस्कर (वय ५६) हे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या आत्महत्येचे प्लॅनिंग करीत होते. यामुळेच दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी पार्टी ठेवली होती.