

Nagpur-based potter Prem Chakbais uses modern machinery to expand his traditional pottery business.
esakal
नागपूर: डोक्यावर नऊ लाखांचे कर्ज, व्यवसायातील नुकसान आणि भविष्याची चिंता. अशा संकटांमुळे एकेकाळी जीवन संपविण्याचा विचार करणाऱ्या प्रेम रामचरण चकबैस यांनी परिश्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर परिस्थिती बदलली. पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी अवघ्या तीन वर्षांत नऊ लाखांचे कर्ज फेडले. आज चार मशीनच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करत त्यांनी पाच कामगारांना रोजगार दिला आहे.