Nagpur News : निरोप देताना पोलिस निरीक्षकाची काढली चक्क मिरवणूक

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या आठवड्यात अनेक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचाही समावेश होता.
Police Inspector Atul Sabnis
Police Inspector Atul SabnisSakal

नागपूर - पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या आठवड्यात अनेक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचाही समावेश होता. यापैकी एक पोलिस निरीक्षकांची बदली झाल्यावर जाताना जुन्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी चक्क या पोलिस निरीक्षकाची मिरवणूक काढत त्यांना निरोप दिला केला.

ही घटना सीताबर्डी पोलिस ठाण्यातील असून वरीष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांची मिरवणूक काढून कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

अतुल सबनीस हे कर्मचारी प्रिय पोलिस अधिकारी आहेत. अतिशय अनुभवी आणि संयमी अधिकारी म्हणून ते प्रचलित आहेत. सीताबर्डी येथे असताना त्यांनी आपला कारभार चोख बजावत काम केले. आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला.

अडीच वर्षानंतर त्यांची बदली लकडगंज पोलिस ठाण्यात झाली. त्यामुळे जाताना त्यांना उत्कृष्ट निरोप द्यावा म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. यावेळी बँडबाजा लावून त्यांची मिरवणूक काढली. आज त्यांनी पोलिस निरीक्षक म्हणून लकडगंज ठाण्याचा पदभार स्वीकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com