

Woman Reunited With Family
esakal
नागपूर : दिवाळीचा सण... सगळीकडे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मात्र, प्रियदर्शिनी शासकीय महिला वसतिगृहाच्या ओट्यावर बसलेली एक रागीणी नावाची महिला मात्र, शांतपणे रडत होती. तिच्या डोळ्यांतील अश्रू खूप काही सांगत होते. पण ओठांवरून स्वतःची ओळखही व्यक्त होत नव्हती. तिची ही अवस्था पाहून सीताबर्डी पोलिस ठाण्यातील ‘पोलीस दीदी’ अनिता वरखडे यांचे पाय थांबले. यावेळी रागीणीच्या नातेवाईकांचा शोध घेत, तिला पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन केले.