
नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यात धुव्वाँधार पावसाने हाहाकार माजवला. या पावसामुळे आलेल्या पुराने जनसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, ४७३ घरांचे नुकसान झाले, दोन व्यक्ती आणि ११ जनावरांचा मृत्यू झाला, तर हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.