
नागपूर : जिल्ह्यात ७ ते ९ जुलैदरम्यान सलग ६० तास झालेल्या मुसळधार पावसाने शेती, घर आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवालानुसार, ३६१ गावांतील ९ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या ७ हजार ४३० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली असून, त्यांना शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.