Risk to Pedestrians and Vehicle Users: नागपूर शहरातील रामदासपेठेत फुटपाथवरील गटारांची झाकणे विस्कटलेली किंवा तिरकी पडली असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
नागपूर: शहरातील उच्चभ्रू आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदासपेठेत नागरी समस्येने डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे अयोग्य पद्धतीने बसवली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.