Leopard Attacks : बिबट्याच्या तावडीत ११ वर्षीय नातू; आजीने दगड-विटांचा मारा करत वाचवला जीव!

Leopard Attacks 11-Year-Old Boy in Ramtek, Nagpur : नागपूरच्या रामटेक तालुक्यात ११ वर्षीय उमेश धनवारवर बिबट्याने हल्ला केला. आजीने दगड-विटांचा मारा करून बिबट्याला पिटाळल्याने मुलाचा जीव वाचला.
An 11-year-old boy was seriously injured in a leopard attack at a brick kiln in Bhilewada, Ramtek. His grandmother chased the leopard away by throwing stones and bricks

An 11-year-old boy was seriously injured in a leopard attack at a brick kiln in Bhilewada, Ramtek. His grandmother chased the leopard away by throwing stones and bricks

esakal

Updated on: 

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात बिबट्याने एका ११ वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भिलेवाडा येथील चौकसे यांच्या वीटभट्टीवर खेळत असताना बिबट्याने मुलावर अचानक झडप घातली. यावेळी मुलाच्या आजीने प्रसंगावधान राखत बिबट्यावर दगड आणि विटांचा मारा केला. आजीच्या या प्रतिकारामुळे बिबट्याने मुलाला सोडून तेथून पळ काढला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...