
नागपूर : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ चे सुधारित निकाल बुधवारी (ता.६) जाहीर केले. यात नागपूर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर गटात २२ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. यापूर्वीच्या निकालात २७ वे स्थान होते. नागपूरने देशात ४० शहरांपैकी ‘२२ ए’ वा क्रमांक मिळाला आहे. तर, राज्यात ४१४ यूएलबीपैकी नागपूरचा ‘२५ ए’ वा क्रमांक आहे.