esakal | दिराने केला वहिनीवर बलात्कार; पतीवरसुद्धा आहे बलात्काराचा गुन्हा | Rape
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

दिराने केला वहिनीवर बलात्कार; पतीवरसुद्धा आहे बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर - भाऊ घरी नसल्याचे पाहून दिराने वहिनीवरच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना हिंगणा हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी वहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित २२ वर्षीय महिलेच्या पतीने २०१६ मध्ये एका तरुणीवर बलात्कार केला होता. या गुन्ह्यात महिलेचा पती फरार होता. त्यानंतर पोलिसांनी पकड वारंट काढून १४ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला अटक केली. त्याला मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तो मेडिकलमधून पसार झाला. त्यामुळे पीडित महिला ही घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही माहिती कुणाला दिल्यास त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला ओरडली असता आरोपी पळून गेला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top