Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू
Accident News: नागपूर शहरात गेल्या सहा महिन्यांत दुचाकी अपघातांमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला असून २७४ जण जखमी झाले आहेत. या अपघातांचा मुख्य कारण रॅश ड्रायव्हिंग आणि राँग साईड वाहन चालवणे आहे.
नागपूर : शहरात गत सहा महिन्यांमध्ये दुचाकीने झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक ७८ जणांनी जीव गमावल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये २७४ वाहनचालक जखमी झाले. त्यातील गंभीर जखमींची संख्या १६१ असून ११६ जण किरकोळ जखमी झाले.