नागपूर : होऊन जाऊ द्या "संत्र्यावर" संशोधन ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur research on oranges framers demand Start a guidance center

नागपूर : होऊन जाऊ द्या "संत्र्यावर" संशोधन !

जलालखेडा : नरखेड तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवळी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

नरखेड तालुका हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिकाच सुरु आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संत्राला मिळणारा अत्यल्प भाव, संत्रा गळती, अशा दृष्टचक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे. यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादन धोक्यात आले आहे. तालुक्यात तापमान ४५ डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्राच्या झाडावरील संत्र्याचे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस नावाचा रोग आल्याने सुद्धा संत्र्याची गळती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

यासाठी आवश्‍यक आहे संशोधन

 • संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही.

 • तालुक्यातील हजारो संत्रा झाडावर कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहेत.

 • कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती, संत्रा बागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर.

 • संशोधक अजूनही उदासिनच.

 • संशोधकांकडून व कृषी विभागाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर केले जात नाही.

 • संत्रा उत्पादक अज्ञात रोगापासून अनभिज्ञ.

असे व्हावे संशोधन

 • संत्रा उत्पादकांना कुठल्याच प्रकारचे योग्य मार्गदर्शन नाही.

 • केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था व क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, संशोधकांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

 • त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल.

 • रोगांवर, संत्रा फळ गळतीवर नेमके काय उपाय सांगण्याची गरज.

 • तालुक्यात तज्ञांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.

नरखेड, काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा गळती होत असून फळांची झाडे पिवळी पडत आहेत, काही झाडे सुकत आहेत. झाडावरील फळे काळे पडत आहेत. रोग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे संत्रा उत्पादकांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

-वसंत चांडक, माजी सभापती, पं. स. नरखेड

Web Title: Nagpur Research On Oranges Framers Demand Start A Guidance Center

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top