esakal | निवासी डॉक्टरांना मिळणार कोरोना सेवेचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

नागपूर : निवासी डॉक्टरांना मिळणार कोरोना सेवेचा लाभ

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये शासकिय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्या सर्व रुग्णांवर येथे यशस्वी उपचारही झाले. यामध्ये शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही आपली सेवा दिली. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले. यावरुन त्यांनी फी माफिची मागणी केली. त्यावर राज्य शासनाने त्यांना त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासनही दिले. परंतु त्यानंतर शासनाने आश्वासन न पाळल्याने निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. यामुळे शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर याचा चांगलाच परिणाम झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यातुन मार्ग काढण्याची ग्वाही दिली व डॉक्टरांनी संप मागे घेतला. त्यानंतर शासनाने आता या डॉक्टरांना १ लाख २१ हजार रुपये मानधन स्वरुपात देण्याबाबतचा शासनादेशही जारी केला. याचा नागपूरातील मेयो, मेडिकलच्या ७४५ वर निवासी डॉक्टरांना लाभ मिळणार आहे.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

निवासी डॉक्टरांनी शिक्षण शुल्क माफ करण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे मेयो, मेडिकलची ओपीडी घटली होती. निवासी डॉक्टरांनी पूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतच मदत दिली. परंतु त्यानंतर यासेवाही न देण्याचा इशारा दिला होता. यानंतर सेंट्रल मार्डच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसात अद्यादेश काढण्याची ग्वाही दिली.

त्यानुसार शासनाने जीआर काढून निवासी डॉक्टरांना कोरोनाच्या दोन्ही लाटेदरम्यान दिलेल्या सेवेच्या रुपात मानधन म्हणून प्रती निवासी डॉक्टरास १ लाख २१ हजार देण्याचे ठरविले. हे मानधन शिष्यवृत्ती आणि मानधनाच्या निधी हेड दिल्या जाणार आहे. हे मानधन ऑक्टोबर २०२१ व मार्च २०२२ अशा दोन टप्प्यांमध्ये दिल्या जाईल. महापालिकेच्या अखत्यारित येणाºया रुग्णालयांमध्ये सेवा देणाºया निवासी डॉक्टरांना महापालिकेच्यावतीने मानधन दिल्या जाणार आहे.

"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर त्यांनी तीन दिवसात निर्णय घेत जीआर काढण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या ग्वाहीची पूर्तता केली आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख व आरोग्य शिक्षण विभागाचे सचिव डॉ. म्हैसेकर यांचे आभार मानले."

- डॉ. सजल बंसल, अध्यक्ष मार्ड मेडिकल

"आमच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रशासनाच्या या निर्णयासाठी मार्डच्यावतीने मुख्यमंत्री, आरोग्य शिक्षण मंत्री व आरोग्य शिक्षण विभाग सचिवांचे आभार मानन्यात येते."

- डॉ. नितीन जगताप, अध्यक्ष मार्ड मेयो

loading image
go to top