Nagpur News: सेवानिवृत्त शिक्षकांचा १०० कोटींचा निधी थकीत; शिक्षक दिनी रस्त्यावर उतरण्याची तयारी
Pending Pension: जिल्हा परिषदेतील ४०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त शिक्षकांचे १०० कोटी रुपयांचे अनुदान दीड वर्षांपासून थकीत आहे. मनसे शिक्षक सेनेने निधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
नागपूर : जिल्हा परिषदेतील चारशेहून अधिक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे सेवा उपदान, अंश राशीकरण आणि गट विमा योजनेचे तब्बल शंभर कोटीचे अनुदान मागील दीड वर्षांपासून शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.