सायबर पोलिसांकडून २०० पोस्ट तपासण्यात आल्या असून त्यात एक पोस्ट बांग्लादेशातून आल्याचे स्पष्ट झाले. या पोस्टमधून भारतीय नागरिकांना धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर : महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराचे (Nagpur Riots) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सायबर पोलिसांकडून त्याचा तपास सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हिंसाचारानंतर बांग्लादेशातून चिथावणीखोर व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ नागपुरातील काहींनी शेअरही केल्याची बाब समोर आली होती.