

Nagpur Rural Development
esakal
नागपूर: देश स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापनदिन साजरा करत असताना शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील वास्तव मात्र वेगळे चित्र दाखवते. तिरंग्याच्या साक्षीने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असला, तरी अनेक गावांतील नागरिक आजही रस्ता, बस, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत. विकासाच्या गप्पा आणि योजनांची आकडेवारी एका बाजूला, तर रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांची मालिका दुसऱ्या बाजूला, अशी स्थिती नागपूर ग्रामीणमध्ये दिसून येते. स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे उलटली, अमृतकाळाचीही चर्चा झाली; मात्र मूलभूत सुविधांसाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा? हा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांच्या जगण्याला आजही छेद देत आहे.