Manja Factory Raid : दादरा-नगर हवेलीत नायलॉन मांजा तयार करणाऱ्या कारखान्यावर नागपूर पोलिसांचा छापा; ६.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nagpur Rural Police Bust Illegal Nylon Manja Factory in Dadra and Nagar Haveli : नागपूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या पुरवठा साखळीचा तपास करत दादरा-नगर हवेली येथील मांजा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.
Manja

Manja

sakal

Updated on: 

नागपूर - प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या पुरवठा साखळीचा तपास करत नागपूर ग्रामीण पोलिसांनी दादरा-नगर हवेलीतील औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या मांजा निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला. बुधवारी (ता. २१) केलेल्या कारवाईत तयार नायलॉन मांजा, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, कच्चा माल, ८८ हजारांहून अधिक चकऱ्या आणि पॅकिंग साहित्य असा एकूण सहा कोटी २६ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com