नागपूर : सेल्समन झाला ‘फ्रिडमली ॲप’ चा प्रणेता

नागपूरकर शेखरची कमाल, पिनकोडच्या आधारे जोडता येतील मित्र
‘फ्रिडमली ॲप
‘फ्रिडमली ॲप
Updated on

नागपूर : देशाचे भविष्य तरूणांच्या हाती आहे, असा उल्लेख वेळोवेळी केला जातो. कौटुंबिक परिस्थिती कशीही असली तरी भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने देशातील तरुण आपल्यातील कौशल्याचे वेळोवेळी दर्शन घडवीत असतात. याचाच प्रत्यय नागपूरकर शेखर देवांगन या २५ वर्षीय तरुणाच्या कार्यातून येतो. सेल्समन, कार वॉशिंग, ऑपरेटर असे छोटे मोठे काम करणाऱ्या शेखरने ‘फ्रीडमली’ ॲप्लिकेशन तयार केले आहे.

शेखर बारावीमध्ये असताना दुर्दैवाने त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे, शेखरसह लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी त्याच्या आईवर आली. त्याची आई आज पारडी येथील भवानीनगरमध्ये हातगाडीवर कपडे विकत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. आईला मदत म्हणून सुरवातीला शेखर कपड्यांच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करू लागला. धडपडत त्याने विज्ञान शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तरुणाईच्या या वयात सोशल मीडियाचे त्याला वेड लागले आणि काही तरी करून दाखविण्याचा त्याने ध्यास घेतला.

‘फ्रिडमली ॲप
ऑक्टोबरअखेर गहू, तांदूळ वाटप करणार

ॲपमध्ये ‘हटके फीचर्स’

या ॲप्लिकेशनचा वापर करताना पिन कोडचा आधार घेत आपण मित्र जोडू शकणार आहोत. तसेच, परीसरा (शहर, राज्य, देश) नुसार ग्रुप, एक्झिट पोल्स (वय, लिंग आदी फिल्टरसह), इव्हेंटसुद्धा क्रिएट करू शकतो. या हटके फिचर्समुळे आपल्या परीसरातील मित्र शोधण्यासह आपल्या विचारांचे लोक, व्यवसाय, होणारे कार्यक्रम याची माहिती घेऊ शकू, ते सुद्धा आपला मोबाईल क्रमांक शेअर न करता.

'सोशल मीडियाची नवलाई असताना मी दिवसातील अनेक तास त्यावर पडीक असायचो. या दरम्यान आपल्या आस पासचे मित्र शोधणे, व्यवसाय आणि इतर आवश्‍यक बाबींचा आजच्या प्रचलीत ॲप्समध्ये समावेश नसल्याचे मला जाणवले. ही उणीव दूर करण्यासाठी मी ‘फ्रिडमली ॲप’ तयार केले आहे. याच्या चाचण्या सुरू असून काही दिवसातच प्रत्येकासाठी ते मोफत उपलब्ध असेल.'

- शेखर देवांगन, संचालक, फ्रिडमली. बॉक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com