

Nagpur News
esakal
नागपूर: महापालिकेच्या तिजोरीत आमच्या घामाचा पैसा जमा होतो. आम्ही पाण्यासाठी टॅक्स भरतो. परंतु आमच्या भागात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. महापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण वस्ती मतदान करते. त्यावेळी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. निवडणूक संपली, आता कोणीच फिरकत नाही. कधी आम्हाला बिनदिक्कत पाणी मिळेल, हाच आमचा सवाल आहे. शहरात सर्वांना सारखाच न्याय द्यावा. परंतु श्रीमंतासाठी वेगळा न्याय, अन् गरिबांच्या वस्तीवर मात्र अन्याय केला जात आहे. महापालिका आम्हाला पाणी देणार नसेल तर आम्ही पाणी कर का भरावा, असा संतप्त सवाल करीत समतानगरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला.