Nagpur Sarpanch Reservation: ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे सुधारित आरक्षण जाहीरl; नागपूर जिल्ह्यात ७५६ पदे; मागास प्रवर्गासाठी १४५

Revised Sarpanch Reservation Announced in Nagpur: जिल्ह्यातील ७५६ पदांपैकी १४५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, ३८५ खुल्या प्रवर्गासाठी, तर महिलांसाठी २७० पदे राखीव आहेत. रामटेक तालुक्यात मागास प्रवर्गासाठी एकही पद राखीव नाही.
Nagpur Sarpanch Reservation

Nagpur Sarpanch Reservation

esakal

Updated on

नागपूर: नागपूर जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे तालुकानिहाय सुधारित आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या १२ ऑगस्ट २०२६च्या शासन शुद्धिपत्रकानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत अधिसूचना जारी केली. सन २०११च्या जनगणनेच्या आधारे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) आणि खुल्या प्रवर्गासह महिलांसाठी सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७५६ सरपंचपदांपैकी १४५ पदे ना.मा.प्र.साठी, ७५ पदे ना.मा.प्र. महिलांसाठी, ३८५ पदे खुल्या प्रवर्गासाठी, तर १९५ पदे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com