Nagpur: गर्भवती मातांसह चिमुकल्यांच्या कल्याणासाठी ‘किलकारी’ योजना, जिल्ह्यात ८५ हजार माता व ७८ बालके ठरणार लाभार्थी

प्रसूत मातेचे बाळ वर्षभराचे होईपर्यंत त्या मातेचा आहार व आरोग्याची काळजी, प्रसूती आणि बाल संगोपणासंदर्भात माहिती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने ‘किलकारी’ योजनेला नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित केले.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Nagpur Kilkari Yojana: प्रसूत मातेचे बाळ वर्षभराचे होईपर्यंत त्या मातेचा आहार व आरोग्याची काळजी, प्रसूती आणि बाल संगोपणासंदर्भात माहिती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने ‘किलकारी’ योजनेला नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित केले. शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे ८५ हजार गर्भवती व प्रसूत मातांसह ७८ हजारांवर बालकांना याचा लाभ होणार आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या ‘किलकारी’ योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला शहर ग्रामीणच्या आरोग्य सेविकाद्वारे आरसीएच पोर्टलवर (रिप्रोडक्टिव अ‍ॅण्ड चाइल्ड हेल्थ प्रोग्रॅम) नोंदणी करावी लागेल. मोबाईलच्या माध्यमातून ही सेवा मिळेल. याला केंद्रीकृत संवाद असे नाव दिले आहे.

ही माहिती मिळेल

या पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर गर्भवती मातेला चौथ्या आठवड्यापासून तर बाळ एका वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती, कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्तनपानाचे महत्त्व, अ‍ॅनीमिया, न्यूमोनिया, मलेरिया, डायरियापासून बचाव, शुद्ध आणि सुरक्षित पाणी व मोफत रुग्णवाहिका सेवा आदींबाबत मोबाईलवर माहिती मिळेल.(Latest Marathi News)

किलकारी योजनेचे लाभार्थी

शहर ४८ हजार ५४६ गर्भवती माता

ग्रामीण २९ हजार ७२३ गर्भवती माता

शहरातील मुले ३१ हजार ०८८ बालके

ग्रामीणमधील मुले २९ हजार ४८७ बालके

आशा स्वंयसेविकांसाठी मोबाईल अकादमी

Nagpur Crime
India's most Wanted Terrorists in Pakistan: भारतात मोस्ट वॉन्टेड असणारा आणखी एका दहशतवादी संपला, पाकिस्तानात झाली हत्या... काश्मीरमधील हल्ल्यांमागे होता हात

राज्यातील आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांचा कौशल्यविकास होईल. राज्यातील ८५ हजार आशा स्वंयसेविकांना या अकादमीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कामकाजाचा लाभ होईल. विशेष असे की, या प्रशिक्षणही ऑनलाइन असणार आहे. (Latest Marathi News)

Nagpur Crime
Tech Layoffs : नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही 'टेक लेऑफ'चा ट्रेंड सुरूच; फेब्रुवारी अखेरपर्यंत सुमारे 50 हजार कर्मचारी घरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com